प्राजक्ता(@prajaktaspj) 's Twitter Profileg
प्राजक्ता

@prajaktaspj

ID:1325832193336250374

calendar_today09-11-2020 16:07:04

9,2K Tweets

15,2K Followers

372 Following

Shankar Bhakare(@ShankarBhakare0) 's Twitter Profile Photo

बाप म्हणजे संसारात आलेली सुखदुःखाची वादळं झेलणारा माणूस,
बाप म्हणजे आपल्या मुलामुलींच उज्वल भविष्य घडवण्यासाठी अहोराञ झटणारा माणूस,
बाप म्हणजे सर्वांच्या अपेक्षा पुर्ण करत असताना माञ स्वःताच्या अपेक्षा सोडून देणारा माणूस,

account_circle
अमोल - MI 💙(@marathifeel) 's Twitter Profile Photo

प्राजक्ता व्यक्त होणाऱ्या भावनांना, समजुतीच्या क्षणांना
हवा शब्दांचा आधार...

अबोल, बोलक्या नजरेला, मनातील स्पंदनांना
हवी सहवेदनेची साथ...

account_circle
प्राजक्ता(@prajaktaspj) 's Twitter Profile Photo

मराठी साहित्य संपदा मुबलक आहे. ती लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचं आहे. सध्याचा काळ हा डिजिटल साक्षरतेचा असला तरीही अजून असंख्य असे आहेत जे पुस्तक हातात धरून वाचण्यात आनंद लुटतात. ई बुक /ऑडिओबुक आपल्याला हवं तेव्हा उपलब्ध होऊ शकतं आणि त्यासाठी थोडीशी जागृती करण्याची गरज आहे.

account_circle
प्राजक्ता(@prajaktaspj) 's Twitter Profile Photo

लिहण्यासारखं बरंच काही असतं
फक्त लिहण्याची इच्छा होत नाही...

कधी कधी आपलंच मन आपल्याला
कोणास ठाऊक ओळखीचं वाटत नाही...

account_circle
प्राजक्ता(@prajaktaspj) 's Twitter Profile Photo

वेदनांची कावड घेऊन खांद्यावर
ठेवावं लागतं हास्य चेहऱ्यावर

नसतो कोणता उपाय काही वेदनांवर
काही बसतात कायमच्याच मानगुटीवर

account_circle
श्री जोशी(@Runanubandh_) 's Twitter Profile Photo

@BedhundMi @me_Bhagyashree हर्षद प्राजक्ता @PRATIKSHAK07 पल्लवी शरद🧔🏻 त र्क वा दी @shapit_1111 ratee Raj Gandre अमिन हुददा. शुभांगी - मी मराठी ❤️ @Messy_Smita09 अव्यक्त श्री💘 जितु ✍️ Roshan Hagawane @PRAKASHKABADI8 @dalvi_chhaya तू हवी आहेस
सोबत माझ्या चालायला

तू हवी आहेस
आयुष्याचा पसारा आवरायला

तू हवी आहेस
बिथरलेल्या मला सावरायला

तू हवी आहेस
मनातले गुपित उलगडायला

तू हवी आहेस
माझ्यातल्या मला ओळखायला

तू हवी आहेस
जगाला प्रेमाचं सार शिकवायला

तू हवी आहेस
जन्मोजन्मीची साथ जपायला

account_circle
त र्क वा दी(@Tarkwaadi) 's Twitter Profile Photo

आयुष्य म्हणजे खोल विहीर
चांगल्या अन् वाईट पायऱ्यांची.
सुख आणि दुःखाणे रचलेल्या
ओबड धोबड सुरेख दगडांची...!!

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

मित्रामित्रांच्या वा दोन स्त्रियांच्या दोस्तीबाबत बघणार्‍यांच्या डोळ्यांचा नंबर कमी-जास्त होत नाही.
....
पण एक स्त्री आणि एक पुरुष म्हटलं की रामायणातल्या लंकेतले नागरिक आणि महाभारतातील कौरव एकत्र येतात.

~व. पु. काळे ✍🏻


राठी

account_circle
त र्क वा दी(@Tarkwaadi) 's Twitter Profile Photo

नकोच घाई
मला जाळण्याची.
गिधाडे समस्त
येतील येथे..!!!

नकोच अश्रू
ना आकांत येथे.
लचके जीवाचे
तुटतील जेथे...!!

✍️

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

सर्व ट्विटरकरांना
आणि राठी नववर्षाच्या मनःपूर्वक आणि कॉफीमय शुभेच्छा... ❤️🙏🏻



सर्व ट्विटरकरांना #गुढीपाडवा आणि #मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक आणि कॉफीमय शुभेच्छा... ❤️🙏🏻 #गुढीपाडवा #कॉफीप्रेमी #म
account_circle
गौ वर्तक(@GauVartak) 's Twitter Profile Photo

✍🏻

जे रोज आजूबाजूला घडते ते वाचता आलं आणि मांडता आलं की थेट लोकांच्या मनास भिडते.लिहिता तेव्हाच येतं जेव्हा तुम्हाला वाचनाची सवय जडते,मग ते पुस्तक असो वा माणसं.वाचत राहा,व्यक्त होतं.त्यासाठी फार मोठं विचारवंत असण्याची गरज नाही फक्त आपलं मत निर्भीडपणे मांडता यावयास हवे.

account_circle
🦋níkítα pαndє.🦋(@nikasparsh) 's Twitter Profile Photo

@BedhundMi @me_Bhagyashree हर्षद प्राजक्ता @PRATIKSHAK07 पल्लवी शरद🧔🏻 त र्क वा दी b£alit...😃😘(मोदी जी का परिवार) @shapit_1111 @sksaroj1011 ratee Raj Gandre अमिन हुददा. शुभांगी - मी मराठी ❤️ स्मिता...🍁 @dalvi_chhaya अव्यक्त श्री💘 जितु ✍️ Roshan Hagawane रित मापं ओलांडून घरामंदी आली...
लंकेची पार्वती मखरात सजली...
शालुतला मोर डोळे मिटून बसला...
पोतेतला मनी हिरव्या चुडयाला हसला...
कपाळीच कुंकु आता देवाला पुसत...
म्हणजे नक्की काय असतं..!


account_circle
श्री जोशी(@Runanubandh_) 's Twitter Profile Photo

@BedhundMi @me_Bhagyashree हर्षद प्राजक्ता @PRATIKSHAK07 पल्लवी शरद🧔🏻 त र्क वा दी b£alit...😃😘(मोदी जी का परिवार) @shapit_1111 @sksaroj1011 ratee Raj Gandre अमिन हुददा. शुभांगी - मी मराठी ❤️ स्मिता...🍁 @dalvi_chhaya अव्यक्त श्री💘 जितु ✍️ Roshan Hagawane हृदय तुझे
स्पंदन माझे
फुले गुलाब
नभात ताजे

तूला पाहतो
उगा हसतो
प्रेमात तूझ्या
मीच फसतो

दाटतो उर
जुळतो सूर
उगाच येतो
अश्रूंना पूर

लागते ठेच
पडतो पेच
मनात माझ्या
दुःखही तेच

account_circle
गौ वर्तक(@GauVartak) 's Twitter Profile Photo

✍🏻

मनुष्य त्याचे वय विसरू शकतो मात्र कमी करू शकत नाही !!!
खरंय ,पण वय म्हणजे एक आकडाच आहे आणि त्याला किती महत्व द्यायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं.मनाने चिरतरूण राहणाऱ्यांना ह्या आकड्यांची तमा नसते.अशी बेफिकीरी माणसाला त्याचं बालपण कधीच हरवू देत नाही...

account_circle
जितु ✍️(@Jitu_Likhit) 's Twitter Profile Photo

स्वप्न भासांच्या क्षितिजावर
रोजच हे मन रेंगाळत जाते...
लाट समुद्राची जावी माघारी,
तसे क्षणांत परतूनी येते..❤️

✍️

account_circle
हर्षद(@Harshrang24) 's Twitter Profile Photo

@BedhundMi @me_Bhagyashree प्राजक्ता @PRATIKSHAK07 पल्लवी शरद🧔🏻 त र्क वा दी b£alit...😃😘(मोदी जी का परिवार) @shapit_1111 @sksaroj1011 ratee Raj Gandre अमिन हुददा. शुभांगी - मी मराठी ❤️ स्मिता...🍁 @dalvi_chhaya अव्यक्त श्री💘 जितु ✍️ Roshan Hagawane समुद्राच्या लाटांकडे बघताना
तुझ्या येण्या जाण्याचा भास होतो
सागराच्या अथांग प्रवाहात
तुझ्या मोहक सौंदर्याची प्रतिमा दिसते
पाण्याचे थेंब अंगावर उडताना
तुझ्या भेटीचा आनंद होतो

account_circle