कसबे सरांना ८० व्या वाढदिवसाच्या सदिच्छा! मराठी विचारविश्वातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा माणूस. संशोधन करून संदर्भासहित लिहिणं म्हणजे काय, हे त्यांच्या लेखनात दिसतं. त्यांच्यासारख्यांकडून विचारधारा आणि व्यवस्थांचे गुंते सोडवायला मदत होते. या अशा माणसांचे आपल्यावरील ऋण अमाप आहे.