Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile
Namdev Katkar

@namdevwrites

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022).

ID: 1318064505130164224

calendar_today19-10-2020 05:40:49

4,4K Tweet

6,6K Followers

997 Following

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

विनेशचं हे यश खास आहे. विशेषत: गेल्या काही काळात तिच्यावरचे आघात पाहता, तिला तोंड द्यावं लागलेली संकटं पाहता. तिनं तिच्या यशातून अनेकांना उत्तर दिलंय. एक्स्प्रेसनं विनेशच्या बातमीसह आंदोलनाचा फोटो छापून, देशभक्तीच्या नावाखाली खेळाडूंना त्रास देणाऱ्यांना सणसणीत चपराक दिलीय.

'लेकीन मिलेगा नहीं अभी' म्हणत हसतेय. काय बाई आहे राव! 😡

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी शशिकांत सेंथिल यांची विस्तृत मुलाखत घेतली होती. ती मुळख तुम्ही इथे पाहू शकाल : youtu.be/aTESVw9AZCA?si… Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

या माझ्या प्रतिक्रियेवर अनेक बिनचेहऱ्याच्या हॅण्डलवरून आक्षेपार्ह शब्दात लिहिले गेले. तरी त्यांना सांगतो, तुम्हा लोकांना लाज वाटायला हवीच. देशभक्ती आणि व्यक्तीस्तोम/पक्षप्रेम यातला फरक कळत नाही तुम्हाला. देशभक्त म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाही आहात. या ट्विटखाली पण बसा बोंबलत!

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

सलमान खुर्शीद यांच्या ज्या भाषणावरून त्यांना टार्गेट केले जात आहे, ते भाषण काल दिल्लीत इस्लामिक सेंटरला समोर बसून ऐकले आहे. त्यांचे पूर्ण भाषण नीट ऐकले, तर संदर्भ लागेल. एखादे वाक्य तोडून ऐकणार असाल, तर चुकीचा अर्थ निघणारच. पण आता संदर्भ तोडून अर्थ लवणाऱ्यांचे सुगीचे दिवस आहेत.

काल मुजिबुर रेहमान यांच्या #ShikwaEHind पुस्तकाचे दिल्लीतील इंडिया इस्लामिक सेंटरला प्रकाशन झाले. मनोजकुमार झा, सलमान खुर्शीद, शशी थरूर, प्रियांका चतुर्वेदी, जवाहर सरकार आणि असदुद्दीन ओवसी यांची मुस्लिम समाज आणि भारत यावर मतं ऐकता आली.

असं सोबत राहता आलं पाहिजे. या शब्दांसाठी आणि या कठीण काळात विनेशला भेटून आधार दिल्याबद्दल खरंच आभार ❤️

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

नीरज चोप्राचे वय आहे २६. कामगिरी डोंगराएवढी. तो खराखुरा तरूणाईचा आदर्श असायला हवा. खेळावरचा फोकस, डेडीकेशन ही त्याची ओळख बनलीये. त्याच्या ओव्हरॲाल वागण्यातही जो नम्रपणा दिसतो, भारी ग्रेस दिसते ती त्याच्यावरील प्रेम, माया अजून वृद्धींगत करते. अभिमान ❣️

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

“All things are subject to interpretation. Whichever interpretation prevails at a given time is a function of power and not truth.” ― Friedrich Nietzsche

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

विनेश फोगाटची खिल्ली उडवणाऱ्या लोकांच्या प्रोफाईल्स मुद्दाम तपासून पाहा. एक समान धागा सापडेल. देशाचं नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उंचावू पाहणाऱ्या खेळाडूसाठी जे लोक आधाराचे दोन शब्द लिहू-बोलू शकत नाहीत, असे कृतघ्न लोक इतरवेळी देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटत फिरत असतात.

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

मला कल्पना आहे, या असल्या व्यसनानं महिन्याकाठी हिशेबाची गणितं फिस्कटतात आपली. तरी उधळू सगळं. पाहू पुढचं पुढे. ही आजची उधळण. ब्लर्बच्या तळातला नवशे नव्याण्णवचा आकडा हुलकावणी देत होता बरेच दिवस. आज त्याला हुलकावणी दिली. अरुंधती रॉयचं नॉन-फिक्शन आणलं.

'मुक्ता' हा सिनेमा म्हणून भारी आहेच. सोबत त्यातली गाणी आणि कविता दोन्ही सुंदर आहेत. यात नामदेव ढसाळ यांची कविता आहे आणि मल्लिका अमर शेख यांचं गीतही. ना. धों. महानोर यांनी लिहिलेलं आणि रवींद्र साठे यांच्या आवाजातील 'त्या माझिया देशातले पंछी निळे जांभळे' हे गाणं तर केवळ अमेझिंग!

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

दूरदेशी गेलेल्या पाखरांची वाट पाहणारे हे गावोगावचे उदास उंबरठे दरसालचे अपरिहार्य ऋतू हतबल वेदनांनी पुढेपुढे सरकवत राहतात, कधीतरी पाखरं पुन्हा फिरतील घरट्याकडे, या खात्रीशून्य आशेने!

भारत सासणेंच्या कादंबरिकेतला नारायण म्हणतो ― 'बात ऐसी है, युनूस, बंधन कुणालाच नको असतं. जो तो बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो. पण तरीही बंधनं येतच असतात, ही किंवा ती. जन्मजात किंवा परिस्थितीतून आलेली. आणि मुक्ती ही एक कल्पना बनून जाते.'