अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile
अक्षरांकित

@aksharankit_070

ID: 1457887599972929542

calendar_today09-11-2021 01:48:13

3,3K Tweet

3,3K Followers

1,1K Following

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

तुझ्या अबोलतेचाही अर्थ कळतो मला.. त्या अर्थाला हळूच कवेत घेऊन.. माझे शब्दही भेटतात अबोल राहून तुला.. #सर्वी

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि नंतर गाव सोडून नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होऊन तब्बल वीस वर्षांनी आपल्या स्वगावी सुट्टी घेऊन परत आलेल्या तरुणाची कथा #सध्या_वाचतोय

गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि नंतर गाव सोडून नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक होऊन तब्बल वीस वर्षांनी आपल्या स्वगावी सुट्टी घेऊन परत आलेल्या तरुणाची कथा 
#सध्या_वाचतोय
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

दोघांचा सुखी संसार म्हणजे सगळं छान,गुडी गुडी कधीच नसतं..इथं असतात कडाक्याची भांडण,राग,न संपणाऱ्या तक्रारी त्यासोबत असतं निखळ प्रेम,विश्वास,आदर,थोडासा समजुतदारपणा..कधी समजावणं, कधी समजुन घेणं, खुप सारी मजामस्ती,कधी गंभीर तर कधी हलक्याफुलक्या क्षणांनी सजलेली रोजची हसतखेळती मैफिल..

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

आपण निवडक असायला हवं..आपले विचार, आपल्या संपर्कातील माणसं, त्या माणसांना द्यावयाचं महत्त्व,आपल्या आयुष्यातील छोट्या वाटणाऱ्या पण प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी आपण निवडून घ्यायला हव्यात..आपल्या मनःशांतीसाठी आणि सुंदर,सुरळीत, सुटसुटीत जगण्यासाठी ते खूप गरजेचं आणि महत्त्वाचं असतं..

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

पुस्तक संपूच नये असं वाटत होतं. शेवट अतिशय हुरहूर लावणारा आहे.

पुस्तक संपूच नये असं वाटत होतं.
शेवट अतिशय हुरहूर लावणारा आहे.
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

एकाच पुस्तकाचे दोन भाग समजून घेताना..एक भाग तु वाच,एक मी वाचते..तु वाचलेलं मी समजून घेईन,मी वाचलेलं तुला आपसुकच कळेल.. पुस्तकांची चर्चा रंगली कि तुझं पुस्तक माझ्याकडे आणि माझं तुझ्याकडे नकळत येऊन जाईल..आपल्या संवादाचा हा आपला आवडता पूल असाच चिरंतन राहील.. #पुस्तकसंवाद

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

आपल्याला जे मनापासून आवडतं तेच आपलं प्रोफेशन असणं..आपल्याला आनंद, समाधान, सुख देणाऱ्या गोष्टी करता येणं..आपली माणसं आपल्या अवतीभवती आनंदी असणं..आपल्या जगण्याचे क्षण शब्दांच्या सुंदरतेमध्ये अलवार जपुन ठेवणं..या इतक्याशा गोष्टींमध्ये आपलं अवघं जग सामावणं म्हणजे जगण्याची सुंदरता..

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

"ट्विटरवरील मानसिक विकृत" कुठं ना कुठं उगवतात ते, टिप्पण्यांच्या गटारातून. चेहरा लपवून, द्वेष दाखवून, ओकतात विष शब्दांतून. देशप्रेमाचा मुखवटा, बायोमध्ये संस्कारांची ओळ, पण आतमध्ये सडका विचार, मनात विटंबनेची भिंत खोल. त्यांना सत्य नको, त्यांना तमाशा हवा, तुमच्या रागाचं

"ट्विटरवरील मानसिक विकृत"

कुठं ना कुठं उगवतात ते,
टिप्पण्यांच्या गटारातून.
चेहरा लपवून, द्वेष दाखवून,
ओकतात विष शब्दांतून.

देशप्रेमाचा मुखवटा,
बायोमध्ये संस्कारांची ओळ,
पण आतमध्ये सडका विचार,
मनात विटंबनेची भिंत खोल.

त्यांना सत्य नको, 
त्यांना तमाशा हवा,
तुमच्या रागाचं
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

जी माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात,आपला मनापासून आदर करतात,स्वतःपेक्षा जास्त जपतात,आपण त्यांच्यासाठी त्यांचा अभिमान वाटतो..अशा लोकांच्या विश्वासाला,आदराला,प्रेमाला पात्र राहणं,त्या पात्रतेचे स्वतःला घडवणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी असते..ही जबाबदारी मनापासून निभावता आली पाहिजे..

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

फक्त थोडा वेळ थांबशील का गं ? वाह काय कविता केलीय त्यातील एक लाईन तर कडक म्हणजे काळजाला भिडली थेट .. ती म्हणजे " काट्यागत पायामध्ये रूतशील का गं " ❣️ #कविता #हृदयस्पर्शी #मराठी

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याची व्याख्या पुन्हा एकदा उजळणी करण्याचा दिवस..आपण सामाजिक, वैचारिक,आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहोत का? हे स्वतःला विचारून जागृक होणं म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करणं.. प्रत्येक स्वतंत्र व्यक्तीला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #स्वातंत्र्यदिन

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

Cadbury Dairy Milk धन्यवाद कॅडबरी.. मराठी भाषेसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे ... अजून यात फक्त मराठी मध्ये लिहिलं गेलं जसं की kai(काय) तर अतिउत्तम होईल.. अक्षरओळख पण हवी ...! #मराठी

<a href="/DairyMilkIn/">Cadbury Dairy Milk</a> धन्यवाद कॅडबरी.. मराठी भाषेसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे ... अजून यात फक्त मराठी मध्ये लिहिलं गेलं जसं की  kai(काय)  तर अतिउत्तम होईल.. अक्षरओळख पण हवी ...! 

#मराठी
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

आपल्या चांगल्या वाईट काळात आपण स्वतःसोबत कायम खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं असतं.. चांगल्या काळात आनंदासोबत नम्रपणा घेऊन आणि वाईट काळात संयमासोबत स्वतःवरील विश्वास ढळू न देता सोबत द्यायला हवी..स्वतःची भक्कम सोबत ही लाखमोलाची असते.ती आपण स्वतःला द्यायलाच हवी..

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

#हलकीफूलकी_ग्रामीण_कथा2 #इमान कथा तशी जुनी आहे, वीस बावीस वर्षांपूर्वीची. गावात चंदू मिस्त्री आपली स्कूटर चालविण्यासाठी प्रसिद्ध होता. बजाज कंपनीची स्कूटर बापाने बंडू मिस्त्रीला घेऊन दिली होती. त्याची चालवायची पद्धत पण खतरनाक होती.

#हलकीफूलकी_ग्रामीण_कथा2 
#इमान
  कथा तशी जुनी आहे, वीस बावीस वर्षांपूर्वीची. गावात चंदू मिस्त्री आपली स्कूटर चालविण्यासाठी प्रसिद्ध होता. बजाज कंपनीची स्कूटर बापाने बंडू मिस्त्रीला घेऊन दिली होती. त्याची चालवायची पद्धत पण खतरनाक होती.
अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

"वयाच्या पंचाहत्तरीत माझ्याकडे मला आवडणारं भरपूर काम समोर आहे. ते मी आनंदाने करते. वयाच्या या वळणावर माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा रितेपणा नाही. माझी अभिरुची माझं काम आहे.." अनुवादक, लेखिका -उमा कुलकर्णी. हे समृद्ध आणि सदृढ आयुष्याचं लक्षण आहे.

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या अनुभवातून आणि येणाऱ्या स्वानुभवातून आपण स्वतःमध्ये नकळतपणे बदल करत असतो..काही बदल आपसुकच होत जातात..प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे असतो.. याची जाणीव मात्र स्वतःला होत नसते..कधीतरी जाणिवपूर्वक मागे जाऊन आपणच स्वतःतील बदलांना भेटायला हवं..

अक्षरांकित (@aksharankit_070) 's Twitter Profile Photo

"आज्जी" या शब्दात भावनांचं एक शहर वसलेलं असतं..हा एक काळ असतो आपल्याला आयती अनुभवांची शिदोरी देऊन घडविणारा..ते एक आवरण असतं आपल्याभोवती लपटलेलं मायेचं, जिव्हाळ्याचं..ते एक सुंदर पर्व असतं तिच्या असण्यानसण्यापलीकडचं.. #आज्जी