आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे येथे आचार्य विनोबा भावे आयुर्विज्ञान संस्था मार्फत मा. अभुदय मेघे सर यांच्या उपस्थितीत सर्व गावातील लोकांची आरोग्य तपासणी सिकलसेल तपासणी करून औषधोउपचार देण्यात आले व काही रुग्णांना संदर्भात करण्यात आले.
आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे अंतर्गत येणारे सिंधी मेघे येथे VHNSC सभे मध्ये "सही पोषण देश रोशन" याप्रमाणे पोषण आहार सप्ताह घेऊन यामध्ये संतुलित आहार ,सकस आहार या बद्दल जनजागृतीच्या माध्यमातून सखोल माहिती देण्यात आली.
रोठा या गावी "ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त "सहजीवन" "ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान समृद्ध करूया" बाबत गावातील सर्व जेष्ठ नागरिकांना आरोग्य आहार -विहार व्यायाम याबाबत माहिती सांगून काही games जे आयोजन करून सहभाग देऊन खेळण्यात आले, तसेच सही पोषण देश रोशन कार्यक्रम घेण्यात आला.
आज दि.02/10/2024 रोजी आयुष्मान भारत आरोग्य मंदिर परम धरम उमरी मेघे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त उपकेंद्र व ग्रामपंचायत येथे प्रतिमेचे पूजन करणात आले तसेच स्वच्छतेची शपथ घेण्यात आली व स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे अंतर्गत येणारे सिंधी मेघे,उमरी मेघे, रोठा व नागठाणा येथील संशयित क्षयरोगरुग्णाचे मा.डॉ.हेमंत पाटील सर (जि.क्षयरोग अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली x -ray व थुंकी तपासणी करण्यात आले. व निक्षय आयडी मध्ये नोंद करण्यात आली.
X-RAY-86 sputum - 47
आयुष्यमान आरोग्य मंदिर उमरी मेघे अंतर्गत येणारे म्हाडा कॉलनी येथे AdultBCG vaccinationकरण्यातआले. शिरभाते मॅडम (LT यांनी संशयित कुष्ठरुग्णाची तपासणी केली. नवीन कुष्ठरोग रुग्ण(PB)निघून औषधोपचार सुरू करण्यातआले,तेथील एरिया मधील 30 सहवासीत लोकांना PEP चा सिंगल डोज देण्यात आले.
मा.डॉ स्वनिल बेले सर(सहाय्यक संचालक कुष्ठरोग आरोग्यसेवा वर्धा) यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी(मे)अंतर्गत येणारे नागठlना येथे वीटभट्टी मजूर यांची कुसुम(कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र )मोहीम अंतर्गत सर्व संशयित लोकांची तपासणी केली,तसेच कुष्ठरोग निदान बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी(मे)येथे मा.स्वप्नील सर(SPO-Jhpiego Pune)श्री घुमरे सर (GDM PCO WR)यांनी भेट देऊन गरोदरपणात होणाऱ्या मधुमेह बाबत तपासणीबद्दल तसेच OGTTpositive ANC
mothe त्यातील(माँ स्वास्थय सांगिनी)app यात रजिस्टर केलेल्या माता यांची मुलाखत घेऊनGDM बाबत मार्गदर्शन केले
आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे येथे भारतातील पहिल्या शिक्षिका ,स्त्री - शिक्षणाच्या प्रणेत्या, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज दी. 26/1/2025 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे येथील ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . त्या दरम्यान स्पर्श जनजागृती अभियान व कृष्टरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
शासन स्तरावरून प्राप्त मार्गदर्शनानुसार आज आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे येथील अनुसुचित जाती जमाती निवासी शाळा येथे *सूर्यनमस्कार दिन* आयोजित करून किशोरवयीन मुलांसाठी योग,संस्कार सुदृढ आरोग्यासाठी योग, बौद्धिक विकासाचे योग इत्यादी उपक्रम घेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.
टी.बी.मुक्त भारत अंतर्गत मा.डॉ पाटील सर (जिल्हा क्षयरोग अधिकारी )यांच्या मार्गदर्शनाखाली ICMR(DTO)मार्फत आयुष्मान आरोग्य मंदिर उमरी मेघे येथे टी.बी. संशयित लोकांचे X-RAY करण्यात आले
एकूण काढलेले X-RAY - 19
कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम अंतर्गत नागठाणा येथे मुख कर्करोग व स्तन कर्करोग विषयक आरोग्य तपासणी करून "Self Breast Examination, Oral Examination" याबद्दल प्रशिक्षण देऊन *"एकजूट होऊ या कर्करोगाला हरवू या"* हा संदेश देऊन मोहिमेची जनजागृती करण्यात आली.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा — गरजूंना आधार देणारा विश्वासाचा हात
1 मे 2025 रोजी माननीय राज्यमंत्री तथा पालकमंत्री मा. पंकजजी भोयर यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे संपन्न झाले.