त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile
त र्क वा दी

@tarkwaadi

हसण्यामागची व्यथा,
कळेल का कुणाला..?
आयुष्याची पटकथा
रडवेल का कुणाला..!!!?

✍️

ID: 1491954767609806848

calendar_today11-02-2022 01:58:41

40,40K Tweet

5,5K Takipçi

1,1K Takip Edilen

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

आपण जेव्हढे प्रगत आणि आधुनिक होतोय, तेव्हढे आपले आयुष्यमान कमी होत चालले आहे. पूर्वी आपल्याच आजूबाजूला वयाची शंभरी गाठलेले अनेक निरोगी म्हातारे आपण बघितलेले आहेत. आजकाल माणूस साठ-पासष्ट वर्ष जगला तरी आश्चर्य वाटायला लागते. जीवनशैली उंचावत आहे, पण जीवनमान मात्र खालावत आहे..!!

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

आशाताई पवार... सगळ्यात जास्त काळजी वाटते ती या माऊलीची... जिवाचा तुकडा, आयुष्याचा - भविष्याचा आधार गेला... आपल्या जिवंतपणी मुलाचा मृत्यू या माऊलीला पाहावा लागला... शेवटचा स्पर्शही ही माऊली लेकाला करु शकली नाही... नियतीने ती संधी ही दिली नाही... १३ दिवसाचं काय घेऊन बसलात ... ही

आशाताई पवार...
सगळ्यात जास्त काळजी वाटते ती या माऊलीची... 
जिवाचा तुकडा, आयुष्याचा - भविष्याचा आधार गेला... 
आपल्या जिवंतपणी मुलाचा मृत्यू या माऊलीला पाहावा लागला...
शेवटचा स्पर्शही ही माऊली लेकाला करु शकली नाही... नियतीने ती संधी ही दिली नाही... 
१३ दिवसाचं काय घेऊन बसलात ... ही
त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

नवीन वर्ष या नश्वर देहाला इकडून तिकडे वाहून नेण्यातच चाललंय. आज रेल्वे जंक्शनवर असलेला हा देह, कधी स्मशानाच्या उंबरठ्यावर जाईल सांगता येत नाही. कॅलेंडर आणि तारखा बदलतात. पण, नशिबाचा प्रवास तोच आहे...! #गुडूर

नवीन वर्ष या नश्वर देहाला इकडून तिकडे वाहून नेण्यातच चाललंय. आज रेल्वे जंक्शनवर असलेला हा देह, कधी स्मशानाच्या उंबरठ्यावर जाईल सांगता येत नाही. कॅलेंडर आणि तारखा बदलतात. पण, नशिबाचा प्रवास तोच आहे...!

#गुडूर
त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

रात्र दिवसभराच्या थकव्यापासून विसावा देते, तर मृत्यू आयुष्याच्या प्रवासातून. शरीर थकले असेल तर रात्र महत्वाची वाटते आणि श्वास थकले असतील तर मृत्यू जवळचा वाटतो..!! Good Night. ❤️

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

मेल्यावरही ज्यांचे नाव विसरल्या जात नाही, तेच खऱ्या अर्थाने जगलेले असतात..!

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

मी मेल्यावर ज्या बाहेरच्या लोकांना फोन करून कळवले जाईल, त्यात फक्त तूच एकमेव असशील..! नक्की येशील ना...!? 😥 #तू #सहजच

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

जेव्हा समोरच्याकडे आपल्या प्रश्नांना देण्यासाठी कोणतंही वैचारिक उत्तर उरत नाही, तेव्हा तो हातघाईवर येतो..! #बौद्धिक_दिवाळखोरी

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

राजकारणात कुणीही एकमेकांचे शत्रू किंवा मित्र नसतात. तिथे फक्त स्वतःसाठीची "सोय" बघितल्या जाते..! #निरीक्षण

Dr Vidya Deshmukh (@drvidyadeshmukh) 's Twitter Profile Photo

परिस्थिती आहे तशी कधीच राहत नसते. अशावेळी भविष्याचा अंदाज घेता यायला हवा. नाहीतर केवळ चुकासाठीच तुमची इतिहासात नोंद होते. #सुप्रभात #राजकीय

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

मासे पकडायला जसा गळ वापरल्या जातो, त्याचप्रमाणे राजकारणात विरोध हासुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी हत्यार म्हणुन वापरला जातो..!

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

आपण जेव्हढं वास्तव स्वीकारून जगायला लागू, तेव्हढं डोकं शांत ठेवता येते. रात्री चांगली झोप हवी असेल, तर अवास्तव स्वप्नांच्या मुसक्या आवळता आल्या पाहिजे. कारण, पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांना आवर घातल्याशिवाय शांतता मिळत नाही...!!

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

ज्यांना राजकारणात खरच इंटरेस्ट आहे आणि राजकारण कशाशी खातात याची खडा न खडा माहिती आहे, ते लोकं कधीच राजकीय विषयावर भांडण/वादविवाद करण्याच्या भानगडीत पडत नाहीत..!! #निरीक्षण

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

सत्य सांगण्यापेक्षा, खोटं बोलण्यासाठी जास्त बुद्धी वापरावी लागते..!! - मार्क ट्वेन

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

“सत्ता नसेल तर लोकांची कामं करता येणार नाहीत, त्यांच्या तोंडाला काय मी पाने पुसायची..!?” - नॉट रिचेबल अजितदादा

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

फक्त राजकारण आणि राजकारण करणारेच नाही, तर आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाची मानसिकता सुद्धा थर्ड क्लास झालेली आहे. कुणी कुणाला दोष देऊन फायदा नाही..! ✌️

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

जो तुमच्या मौनाचा अर्थ समजत नाही, तो तुमच्या शब्दांनाही कधी समजू शकणार नाही...!! - खलील जिब्रान

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

तुम्ही एकटेच राहात असाल आणि त्यातल्या त्यात बॅचलर असाल, तर तुमचे शेजारी तुमच्या बारीकसारीक गोष्टीवरही लक्ष ठेवून असतात. खास करून घरी एखादी मैत्रीण/ किंवा मैत्रिणी आल्या असतील तर कंपाउंड वॉल वरून उंटासारखी मान उंच करून, काय चाललंय याचा कानोसा घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.. 😂

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या वाट्याला कधीही दुःख आले नाही, त्यांना सांत्वन कसे करावे हे कधीच कळणार नाही. आपली वेदना आपल्याला इतरांच्या वेदना समजून घेण्यास पात्र बनवते...!! - रॉबर्टसन

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

अरेंज मॅरेज मध्ये एकमेकांविषयीची बरीच माहिती लपवलेली असते. कितीही चौकशी केली असली तरी सर्वच माहिती कळेल असं नाही. लग्न जमवण्यासाठी खोट्या गोष्टींचाही दिखावा केल्या जातो, जो लग्नानंतर उघडा पडतो..!

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

सहानुभूती दाखवणं सोपं असतं, पण ती परिस्थिती जगणं मात्र अशक्य. बाहेरून शांत दिसणारी माणसे बरेचदा आतून राख झालेली असतात..!!